आर.सी. काळे माध्यमिक विद्यालयात ‘जागतिक हात धुवा दिन’
- by Yogesh Bandagale
- October 18, 2025
- 59 views
पेढे, परशुराम (ता. चिपळूण) : दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आर.सी. काळे माध्यमिक विद्यालयात ‘जागतिक हात धुवा दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमाला शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. माळी मॅडम, सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सौ. माळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी हात धुवा दिनानिमित्त प्रतिज्ञा घेतली आणि हात धुण्याची योग्य पद्धत प्रत्यक्ष करून दाखवली.
विद्यार्थ्यांना हात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम समजावून सांगितला गेला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन “आपले हात स्वच्छ ठेऊ, आरोग्याची काळजी घेऊ” ह्या घोषवाक्याने समारोप केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली आणि निरोगी जीवनशैलीस प्रोत्साहन मिळाले, असे शाळा प्रशासनाने सांगितले.
