बा. सी. मर्ढेकर कविकट्ट्यात कवी संदीप चाचे यांचे काव्यसादरीकरण
- by Yogesh Bandagale
- January 11, 2026
- 32 views
सातारा : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा २०२६ अंतर्गत आयोजित बा. सी. मर्ढेकर कविकट्टा अंतर्गत सत्र क्रमांक ०३ मंगळवार, ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत पार पडले.
या सत्रात कवी संदीप वसंत चाचे (मुंबई; मूळ गाव मुरादपूर, ता. संगमेश्वर) यांनी आपल्या ‘लेखणी’ या कवितेचे सादरीकरण केले. लेखणीच्या सामर्थ्याचे आणि शब्दांच्या ताकदीचे प्रभावी दर्शन घडवणाऱ्या या कवितेला उपस्थित साहित्यप्रेमींकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सादर झालेल्या या काव्यसादरीकरणामुळे कविकट्ट्यात साहित्यिक वातावरण निर्माण झाले असून, रसिकांनी कवितेच्या आशयाची विशेष प्रशंसा केली.
