पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- by Yogesh Bandagale
- October 21, 2025
- 143 views
रत्नागिरी: पत्नीला वारंवार मारहाण केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरती निलेश भागवत (वय ३७, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, २०१८ पासून पती निलेश सुरेश भागवत (वय ४२), नणंद दिक्षिता दिलीप यादव (रा. लांजा) आणि एक अल्पवयीन मुलगी यांनी त्यांना वारंवार मारहाण केली.
या संदर्भात १५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
