निलेश भोसले यांचा सत्कार
- by Yogesh Bandagale
- December 05, 2025
- 306 views
चिपळूण : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सह सचिवपदी निवड झाल्याबद्दल आमचे मित्र निलेशजी भोसले यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, एअर इंडियाचे माजी खेळाडू सचिन कोळी, तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव सचिन कुलकर्णी, तसेच वैभव महाडिक उपस्थित होते.
निलेश भोसले यांचे कुटुंबीयही या विशेष क्षणी उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. सर्व मान्यवरांनी भोसले यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या आगामी कार्याला शुभेच्छा दिल्या.
