संगमेश्वर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सौ. नियती चव्हाण बिनविरोध निवड; सर्व कार्यकारिणी महिला पदाधिकाऱ्यांची

देवरूख : संगमेश्वर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीमती सौ. नियती योगेश चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात प्रथमच या संघटनेच्या अध्यक्ष, सचिव आणि सर्व कार्यकारिणी पदांवर महिलांची बिनविरोध निवड होऊन एक आगळावेगळा आदर्श निर्माण झाला आहे.

रविवार, दि. १२ रोजी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री रवींद्र लोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी नूतन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या अधिकाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरवही करण्यात आला.

नव्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सौ. नियती योगेश चव्हाण, सचिवपदी सौ. तृप्ती योगेश मोहिरे, उपाध्यक्षपदी सौ. संजीवनी संतोष गवंडी, सहसचिवपदी सौ. समिक्षा समीर मोहिते, सल्लागारपदी सौ. मेघा रवींद्र सुवारे, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ. श्रृती रूपेश सावंत, सौ. जान्हवी मंदार आंबेकर, सौ. गितांजली हिरालाल चावरे आणि सौ. सोनम कुंभार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

याशिवाय, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या राज्य संघटनेवर संगमेश्वर तालुक्यातून सौ. शैला कृष्णा नटे यांची महिला कौन्सिलर म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडीनंतर संघटनेच्या सर्व सभासदांनी महिलांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या नव्या कार्यकारिणीबद्दल समाधान आणि अभिमान व्यक्त केला. मावळते अध्यक्ष श्री रवींद्र लोटणकर, सचिव श्री राजेंद्र पाटील, पतसंस्था संचालक श्री राजेश इंदूलकर, श्री अनिल गोपाळ, श्री सुहास शिंदे, श्री रमेश चाळके, श्री अखिलेश गमरे, श्री अभिजित शेळके आणि श्री प्रशांत शेट्ये यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

नुतन अध्यक्ष सौ. नियती चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सर्व सभासदांचे आभार मानत विश्वास व्यक्त केला की, “संघटनेच्या प्रगतीसाठी सर्व पदाधिकारी एकजुटीने काम करून सहकाराचा आदर्श उभा करतील.”
 

संबंधित लेख