धामणी बडदवाडी सभागृह भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न
- by Yogesh Bandagale
- September 23, 2025
- 25 views
धामणी बडदवाडी : शासनाच्या योजनांचा निधी सुयोग्य रितीने वापरल्यास आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग राहिल्यासच विकास खऱ्या अर्थाने यशस्वी होतो, असे प्रतिपादन संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी केले.
धामणी बडदवाडी येथे नुकतेच कुणबी सभागृहाचे भूमिपूजन आमदार निकम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “शासनाच्या अनेक योजना गावात येतात, मात्र त्यासाठी स्थानिकांचा सहभाग अनिवार्य असतो. पाणी योजनेत ग्रामस्थांनी निधी उभा करून योजना यशस्वी केली, त्याचप्रमाणे सभागृहही ग्रामस्थांच्या एकतेतून दर्जेदार उभारले जाईल. यामुळे महिलांना, विद्यार्थ्यांना तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांना नवे व्यासपीठ उपलब्ध होईल.”
सभागृहासाठीचा निधी आमदार निधी तसेच कोयना भूकंप योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. या प्रसंगी जि.प. माजी अध्यक्ष संतोष थेराडे, संचालक राजेंद्र सुर्वे, उद्योजक प्रभाकर घाणेकर यांनी मनोगत व्यक्त करत ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले.
कार्यक्रमाला सरपंच संतोष काणेकर, उपसरपंच संगम पवार, गावकर चंद्रकांत बांबाडे, श्रीनिवास पेंडसे, संतोष भडवळकर, अनंत उजगावकर, दत्ता लाखन, दत्ता ओकटे, अरविंद जाधव, हरिश्चंद्र गुरव, सुरेश साळवी, ग्रामसेवक शेखर जाधव यांच्यासह महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश रांजणे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रामचंद्र बांबाडे यां
नी केले.
