देवरूखमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

देवरूख (संगमेश्वर तालुका) : देवरूख येथील पत्रकारांच्या वतीने आज मंगळवारी मराठी पत्रकारदिन व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पत्रकार सागर मुळ्ये, सचिन मोहिते, निलेश जाधव, सुरेश करंडे, मिथुन लिंगायत, सिद्धेश पातेरे तसेच सामाजिक कार्यकर्ते युयुस्तू आर्ते उपस्थित होते.

मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. यामुळे ते मराठी पत्रकारितेतील ध्रुवतारा ठरले आहेत. उपस्थित पत्रकारांनी बोलताना सांगितले की, जांभेकरांच्या कार्यामुळे आज पत्रकारांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक मिळते आणि त्यांच्या कार्याचा स्मरण करून आपण पत्रकारितेत गुणवत्ता व निष्ठा जोपासावी.

यावेळी पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा आढावा घेत, त्यांच्या आदर्शांचा संचार करून पुढील पिढ्यांमध्ये पत्रकारितेची गोडी टिकवण्याचे आवाहन केले.

संबंधित लेख