दरडप्रवण भागांची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याकडून पाहणी; केंद्रीय पथकासोबत भेट

चिपळूण : खेंड बडदेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी घराच्या छपरावर दरड कोसळण्याची घटना घडली होती. तसेच कांगणेवाडी परिसरातही पावसाळ्यात आतापर्यंत तीन वेळा दरड कोसळण्याचे प्रकार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दरडप्रवण भागांचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

या वेळी नगराध्यक्षांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. या भागांमध्ये वारंवार दरडी कोसळत असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या ठिकाणी तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, त्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

केंद्रीय पथकाने या दरडप्रवण भागांचा अभ्यास करून आपला अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. त्या अहवालाच्या आधारे आवश्यक निधी मंजूर करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या पाहणी दौऱ्यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, माजी नगरसेवक आशिष खातू, बांधकाम विभागाचे अधिकारी सुरज चिपळूणकर, श्री. निंबाळकर, रविकांत सातपुते, नगरसेवक उदय जुवळे, सुयोग चव्हाण, निशांत जंगम आदी उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या पुढाकारामुळे दरडप्रवण भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित लेख