चिपळूण अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी अजय खातू यांची बिनविरोध
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 222 views
चिपळूण : सहकार क्षेत्रात कोकणात अग्रेसर असलेल्या चिपळूण अर्बन बँकच्या व्हाईस चेअरमनपदी गुहागर येथील संचालक अजय खातू यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अजय खातू हे गुहागरमधील यशस्वी उद्योजक असून सहकार क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जातात.
विद्यमान अध्यक्ष मोहन मिरगल यांनी अजय खातू यांचे स्वागत केले. यावेळी विक्रांत जाधव, नगरसेवक फैसल कासकर, मावळते उपाध्यक्ष रहिमान दलवाई यांच्यासह बँकेचे सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.
गुहागर व चिपळूण परिसरातून अजय खातू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्राला अधिक बळ मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
