उडान महोत्सवात विविध स्पर्धांनी भरली डीबीजेत रंगत

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयामध्ये 'उडान युवा मनाची २०२५' महोत्सव सुरू आहे. या महोत्सवांतर्गत महाविद्यालयामध्ये विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने जीन्स डे,फनी गेम्स, पारंपरिक वेशभूषा,गरबा,दांडीया नृत्य,असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कनिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभागाचे वतीने स्केचिंग, ड्राॅंईऺग,मेहंदी,सलाड डेकोरेशन, रांगोळी स्पर्धेचे आयोजित करण्यात आली.या स्पर्धेला विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ माधव बापट, उपप्राचार्य सौ.स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ.सुजाता खोत, स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा.अनिल पुनवतकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन केले. ही  स्पर्धा आयोजित करण्याकरिता सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कांचन तटकरे ,सांस्कृतिक विभाग समिती सदस्य , प्रा. मिता तांबे, प्रा.शुभांगी,इंगळे प्रा.निलम शिंदे, प्रा. विठ्ठल कोकणी, यांनी विशेष परिश्रम घेतले.  प्रा.प्राजक्ता चितळे,प्रा.सोनाली खर्चे,प्रा.स्वरदा कुलकर्णी ,प्रा.तृप्ती यादव,प्रा.जयंती काटदरे,प्रा.मृण्मयी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले .

संबंधित लेख