चिपळुणात शिवसेना, महिला आघाडी आणि युवासेनेची संयुक्त बैठक संपन्न
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 180 views
चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, महिला आघाडी आणि युवासेनेची संयुक्त कार्यकारिणी बैठक प्राथमिक शिक्षक पतपेढी हॉल येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे, नागरिकांशी संपर्क वाढविण्याचे आणि राजकीय घडामोडींविषयी सावध राहण्याचे निर्देश दिले.
वरिष्ठ नेते आणि जेष्ठ शिवसैनिकांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “जनतेचा संपर्क, एकजुटीचा संकल्प आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचे नेतृत्व” या मंत्राने आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसैनिक सज्ज व्हावेत. कार्यकर्त्यांनी एकजुटीचा नारा देत लढाईसाठी तत्पर असल्याची भावना व्यक्त केली.
या बैठकीस जिल्हा समन्वयक मंगेश शिंदे, चिपळूण क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, महिला उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, महिला क्षेत्रप्रमुख रूमा देवळेकर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, तालुका संघटक राजू देवळेकर, माजी नगरसेवक मोहन मिरगल, ज्येष्ठ शिवसैनिक राजू भागवत, शहर सचिव प्रशांत मुळये, महिला तालुका संघटिका मानसी भोसले, महिला शहर संघटिका वैशाली शिंदे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्यासह उपतालुकाप्रमुख, उपशहर प्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
शिवसेना चिपळूण विभागात — किशोर सातपुते (विभागप्रमुख), विकास गांगण (उपविभाग प्रमुख), समीर माळी व फैजान कास्कर (शाखाप्रमुख).
महिला आघाडीत — रतिका रवींद्र शिंदे (विभागप्रमुख) आणि सुवर्णा प्रकाश कदम (शाखाप्रमुख).
युवासेनेत — आसिम लासणे (विभागप्रमुख), निहाल नाईक, शाकीर अरकटे, आर्यन भुवड, सर्वेश चिपळूणकर (उपविभाग प्रमुख) तसेच हसन मुकादम व अली सागळे (शाखाप्रमुख) यांची नियुक्ती करण्यात आली.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून आणि युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर प्रमुख सचिन (भैया) कदम यांच्या सूचनेनुसार, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्या नेतृत्वात रेहान पवार, वात्सल्य तिवारी, तन्मय पडवळ, अथर्व कदम, अथर्व मुंडेकर, रोहन पवार, उझेर बांगी, इबाद बांगी आणि फर्जान सय्यद या तरुणांनी युवासेनेत प्रवेश केला.
या नव्या तरुण शक्तीच्या सहभागामुळे शिवसेनेच्या संघटनाला चिपळूणात नवे बळ मिळाले असून आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक सक्षम होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
