अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी घेतले टेरवच्या आई भवानी वाघजाई मातेचे दर्शन
- by Yogesh Bandagale
- January 01, 2026
- 464 views
चिपळूण : मराठी बिग बॉस फेम तसेच देवयानी, फुलवा या लोकप्रिय मालिकांमधून आणि ट्रीपल सीट, झिम्मा २ या गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री शिवानी सुर्वे ननावरे तसेच ऊन सावली, सोंग्या, पावन खिंड या मालिकांमधील आणि ऊन सावली या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य ननावरे यांनी गुरुवारी दि. १ जानेवारी २०२६ रोजी श्री क्षेत्र टेरव येथे आई भवानी वाघजाई मातेचे दर्शन घेतले.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवीचे दर्शन घेतल्याने परिसरात भक्तिभावाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. देवीच्या चरणी नतमस्तक होत कलाकारांनी सर्वांसाठी सुख, शांती व समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली.
या वेळी देवस्थानच्या वतीने मान्यवर कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दर्शनप्रसंगी देवस्थानचे पदाधिकारी, स्थानिक भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी चित्रपट व दूरदर्शन सृष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीमुळे श्री क्षेत्र टेरव येथे भक्तांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
