खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड
- by Yogesh Bandagale
- October 08, 2025
- 71 views
मुंबई : देशातील प्रमुख आणि अत्याधुनिक विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा ड्रग्ज तस्करीचा थरार उघडकीस आला आहे. खजुराच्या पॅकेटमध्ये लपवून तब्बल २ किलो १७८ ग्रॅम कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला आहे. या कोकेनची बाजारभावानुसार किंमत तब्बल २१.७८ कोटी रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) ही मोठी कारवाई करत कोकेन जप्त केले असून, सिएरा लिओन वरून आलेल्या प्रवाशासह कोकेनची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या आणखी एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात दोघांविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात असे स्पष्ट झाले आहे की, आरोपींनी खजुराच्या पॅकेटमधून खजुर काढून त्यातील बिया बाहेर काढल्या व त्या जागी कोकेन भरून पुन्हा खजुराचे स्वरूप दिले होते. या हुशारीने पॅक केलेल्या पॅकेट्समधून तस्करी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, विमानतळावरील दक्ष सुरक्षा तपासणीदरम्यान हा डाव हाणून पाडण्यात आला.
या कारवाईनंतर मुंबई विमानतळ सुरक्षा यंत्रणा आणि महसूल गुप्तवार्ता विभागाचे हे मोठे यश मानले जात आहे. पोलिसांनी आता या कोकेनचा भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरवठा साखळीशी असलेला संबंध शोधण्याचे काम सुरू केले आहे.
मुंबई विमानतळावर पूर्वीही सोनं, ड्रग्ज आणि इतर प्रतिबंधित वस्तूंची तस्करी उघडकीस येत असते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतत सतर्क असून, अशा प्रकारच्या कारवायांनी पुन्हा एकदा तस्करांचे डाव उधळले आहेत.