कामथे उपसरपंचपदी नानाशेठ महाडीक बिनविरोध
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 310 views
चिपळूण : कामथे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्री. नानाशेठ महाडीक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ. दिशा ताई दाभोळकर व खेर्डी ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री. दशरथशेठ दाभोळकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी कापसाळ गावचे सरपंच श्री. सुनील गोरिवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा खेर्डी ग्रामपंचायत सदस्य श्री. रियाज खेरटकर, खेर्डी ग्रामपंचायत सदस्य श्री. राकेश दाभोळकर, श्री. मोबिन माटवणकर, श्री. वैभव महाडीक आदी मान्यवर उपस्थित होते.
