अधिकाऱ्यांनी कामात कसूर करु नये – राज्यमंत्री योगेश कदम
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 59 views
रत्नागिरी, दि. १९ (जिमाका): “शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायलाच हवा. अधिकारी जर कामात कसूर करतील तर त्यांच्यावर कारवाई टाळता येणार नाही,” असा इशारा ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.
दापोली तालुक्यातील देगाव येथे आज विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार अर्चना बोंबे, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, तालुका प्रमुख उन्मेष राजे, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, ममता शिंदे, प्रकाश कालेकर, अनंत करबेले, प्रभाकर गोलांबडे, विश्वास खांबे आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान महावितरण, टेलिफोन, सार्वजनिक बांधकाम, पोस्ट ऑफिस, कृषी विभाग, महसूल विभाग अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी आपले प्रश्न मांडले.
यावेळी शासकीय दाखल्यांचे वाटपही करण्यात आले.
