युती झाली तर ठीक, नाही झाली तरी स्वबळावर सज्ज!; आ. शेखर निकम यांचा इशारा
- September 20, 2025
- 81 Views
चिपळूण : चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत भराडे येथील राधाकृष्ण मंदिराच्या कंपाउंड वॉलचे काम तसेच भराडे अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
मागील वर्षी हरिनाम सप्तहाच्या वेळी भराडे गावाला दिलेल्या भेटीत आमदार शेखर निकम यांनी पुढील हरिनाम सप्तहापूर्वी मंदिराचे कंपाउंड वॉल आणि मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्ण करण्यात येईल असा शब्द ग्रामस्थांना दिला होता. दिलेला शब्द त्यांनी वेळेत पूर्ण केल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे मनापासून कौतुक केले.
या प्रसंगी आमदार निकम म्हणाले, “तुम्ही ज्या प्रकारे माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहात, त्यामुळेच विकासकामे मार्गी लागतात. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणे हेच माझे ध्येय आहे.”
यावेळी प्रतापराव शिंदे यांनीही आमदारांच्या कार्यशैलीचे कौतुक करत, योग्य आणि सक्षम नेतृत्वासोबत असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे उद्गार काढले.
या उद्घाटन कार्यक्रमास आमदार शेखरजी निकम, प्रतापराव शिंदे, दादासाहेब साळवी, सूर्यकांत खेतले, निलेश कदम, दिनेश शिंदे, प्रमोद महाजन, इकबाल मुल्ला, अरविंद सागवेकर, बाबू मोहिते, राजेश चव्हाण, श्याम खेतले, संजय चव्हाण, संजय जाधव, प्रदीप चव्हाण, दीपक चव्हाण, शिंदे सर, मनोहर चव्हाण, मनोज जाधव, मनोज चव्हाण, रघुनाथ कदम, शेखर जाधव, श्रीधर जाधव, सुरेश चव्हाण, राजेंद्र सुतार, अजिंक्य शिंदे, सचिन भोसले, हर्षद चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
या विकासकामांमुळे भराडे गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
