अत्याधुनिक ऑटोमेशन प्रशिक्षण आता चिपळुणात उपलब्ध: लवकरच पहिली बॅच

चिपळूण (वार्ताहर): मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये तेही प्रचंड खर्चिक असणारे अत्याधुनिक ऑटोमेशन प्रशिक्षण आता चिपळूणमध्ये उपलब्ध होणार आहे. शहरालगतच्या खेर्डी  भागात इनोव्हेटटेक अकॅडमीतर्फे लवकरच पहिली बॅच सुरू होत आहे.

औद्योगिक क्षेत्रात PLC , SCADA , DCS, HMI अशा ऑटोमेशन तंत्रज्ञानाची मागणी झपाट्याने वाढत आहे.  ही गरज लक्षात घेऊन कोकणातील  विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी चिपळुणात ऑटोमेशन प्रशिक्षण कोर्स सुरू होत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी पुणे-मुंबईसारख्या महानगरांत जाण्याची आता गरज नाही. शिवाय महानगरात राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्च सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारा नाही.हीअडचण लक्षात घेऊन कोकणातील विद्यार्थ्यांना आपल्या गावीच जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने श्री यज्ञेश सच्चिदानंद म्हाडदळकर यांनी ‘InnovetTech Academy’या ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटची स्थापना चिपळूण येथे केली आहे.या अकॅडमीमध्ये लघु व सखोल प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील सराव, प्रोजेक्ट काम व करिअर मार्गदर्शनाची सुविधा दिली जाणार आहे. 

संस्थेविषयी माहिती देताना श्री म्हाडदळकर म्हणाले, “विद्यार्थ्यांना उद्योगात आवश्यक कौशल्ये शिकवून रोजगाराच्या संधीपर्यंत पोहोचविणे हा आमचा प्रमुख हेतू आहे. तसेच स्थानिक विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात हे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा आमचा संकल्प आहे.आमची पहिली बॅच लवकरच सुरू होत असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर   7498004736 / 7588779566 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

संबंधित लेख