देवरुख ग्रामीण रुग्णालयात आमदार निकम यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उदघाटन
- September 23, 2025
- 20 Views
चिपळूण : चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक ०२ डिसेंबर २०२५ रोजी शांततेत पार पडली असली, तरी मतमोजणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षिततेसाठी आघाडीच्या (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार) उमेदवारांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रमात बदल झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे (EVM) ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेत वाढ, नेटवर्क जॅमर बसवणे, सीसीटीव्हीचे अधिक सक्षम कव्हरेज आणि मतमोजणीच्या दिवशी संचारबंदी लागू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर शिक्कामोर्तब करण्यासाठी माजी आमदार आणि नगराध्यक्ष पदाचे आघाडीचे उमेदवार रमेश भाई कदम स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत शिरीष काटकर, फैसल कास्कर, मोहन शेठ मिरगल, निहार गुढेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तालुका अध्यक्ष मुराद आड्रेकर, शहर अध्यक्ष रतन पवार आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी हे प्रमुख नेते उपस्थित होते.
दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही शंका निर्माण होऊ नये आणि पूर्ण पारदर्शकता राखली जावी, अशी ठाम भूमिका बैठकीत मांडली.
1️⃣ स्ट्रॉंग रूमला ‘झेड प्लस’ सुरक्षा
मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा तातडीने अत्यंत उच्च पातळीवर ('Z+ pattern') वाढवावी.
2️⃣ नेटवर्क जॅमर बसवावे
स्ट्रॉंग रूम परिसरात तसेच मतमोजणी केंद्रावर कोणत्याही प्रकारचे संचार, अनधिकृत संपर्क किंवा गैरप्रकार होऊ नयेत म्हणून नेटवर्क जॅमर बसवण्याची मागणी.
3️⃣ मतमोजणी केंद्राजवळ संचारबंदी (Curfew)
मतमोजणी पूर्ण होईपर्यंत केंद्राच्या १००० मीटर परिसरात संचारबंदी लागू करावी, जेणेकरून शांतता राखली जाईल व कोणतेही अनुचित जमावबंदी होणार नाही.
4️⃣ अनाधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी
मतमोजणी केंद्राच्या १००० मीटर परिघात राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा उमेदवारांनी प्रवेश करू नये.
तसेच मतमोजणीच्या दिवशी विश्रामगृह, लॉज किंवा अन्यत्र होणाऱ्या सर्व राजकीय बैठका तात्काळ थांबवाव्यात.
5️⃣ EVM चे पुनर्प्रशिक्षण / तपासणी
मतमोजणी प्रक्रियेत पूर्ण विश्वास आणि पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक असल्यास EVM चे पुनर्परीक्षण किंवा पुनर्प्रशिक्षण करण्यात यावे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशभाई कदम यांच्यासह
आरिफ हजवाने, इम्तियाज मुकादम, अजय भालेकर, वैशाली कदम, शैलेश टाकळे, नसरीन खडस, डॉ. नियाझ पाटे, समिधा जोगळे, राहुल कांबळे, सपना पवार, राजेश केळसकर, नगमा रियाने, सुनील कुलकर्णी, साक्षी शिंदे, Adv. अजय कांबळी, नुपुर बचीम, राकेश दाते, युगंधरा शिंदे, सानिका टाकळे, मोहन मिरगल, उमा देसाई, गणेश फके, महाडीक, विकी नरळकर आणि कांचन शिंदे यांनी या मागण्यांना एकमुखी समर्थन दिले.
