सोनगाव येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन
- by Yogesh Bandagale
- December 22, 2025
- 152 views
लोटे : सोनगाव येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत होणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी शिवसेना (उबाठा) नेते व गुहागर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. भास्करशेठ जाधव यांच्या शुभहस्ते पार पडले.
या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या विकासकामामुळे सोनगाव व परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. दैनंदिन वाहतूक, शेती व इतर मूलभूत गरजांसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. अरुणाताई आंब्रे, तालुकाप्रमुख श्री. अंकुश काते, तालुका सचिव श्री. संदीप (बावा) कदम, युवासेना तालुका प्रमुख डॉ. मच्छिंद्र गोवळकर, महिला तालुका संघटिका सौ. संजीवनी नरळकर, उपतालुकाप्रमुख श्री. विजय साळुंखे, विभागप्रमुख श्री. राजेंद्र घाग, सोनगाव सरपंच सौ. भारती पडवल, उपसरपंच श्री. मिलिंद घोरपडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाखाप्रमुख श्री. संजय खेराडे, दीपक घाग, उपविभाग प्रमुख श्री. नंदू कांबळे, जयवंत पालांडे, सुमित चव्हाण, सुरेश कारकर, प्रकाश खेराडे, नामदेव घाग, संदीप घाग, दिलीप दिवेकर, प्रवीण काते, उमेश महाडिक, चंद्रकांत गमरे, संजय कदम, रवींद्र खेराडे, विष्णू घाग, विलास नलावडे, आनंद घाग, विनायक घाग तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. शेखर मोरे, समृद्धी जाधव, रेवा खेराडे, निशा खेराडे, निकिता किजबिले आदी मान्यवर उपस्थित होते.
या विकासकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जमीनमालक, ग्रामपंचायत व शिवसैनिकांचे विशेष आभार यावेळी मान्य करण्यात आले.
