गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : अज्ञात कारणातून गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान १८ डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बाबू माने (वय ३०, रा. पटवर्धनवाडी, उद्यमनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. दीपक माने याने बुधवार, १० डिसेंबर रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी गवत मारण्याचे औषध प्राशन केले होते.

काही वेळानंतर त्याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान, १७ डिसेंबर रोजी त्याला पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित लेख