देवरुख ग्रामीण रुग्णालयात आमदार निकम यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उदघाटन
- September 23, 2025
- 20 Views
रत्नागिरी : "रा.स्व.संघाला १०० वर्षे पूर्ण झाली, पण एवढ्या काळात त्यांना स्वतःचे नेतृत्व निर्माण करता आले नाही. दुसऱ्या पक्षातील तयार झालेले नेते पळवून आणून आपल्या पक्षात घेण्याचे काम हेच त्यांनी केले," असा थेट आरोप उबाठा गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
ते म्हणाले की, संघाच्या विचारांचे अनेक जण कौतुक करतात, पण खरं नेतृत्व घडविण्यात ते अपयशी ठरले. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील नेत्यांकडे पाहिले तरी त्यापैकी कोणीही भाजप- संघ- विश्व हिंदू परिषद यांच्या विचाराने प्रेरित होऊन गेलेले नाहीत. बहुतेक जण चौकशी आणि जेलच्या भीतीमुळे गेले आहेत. "हा संघाचा पराभव आहे," असा घणाघात त्यांनी केला.
भास्कर जाधव म्हणाले की, आतापर्यंत ज्यांनी पक्षांतर केले आहे त्यांच्यावर काही ना काही चौकशी सुरू आहे. भाजपने मोठं ‘वॉशिंग मशीन’ आणलं आहे, त्यात जाऊन सर्वजण स्वतःला स्वच्छ करून घेत आहेत. "एकनाथ शिंदेंनी तर अमित शहांकडून छोटे वॉशिंग मशीन आणलेलं दिसतं," अशी खोचक टीका त्यांनी केली.
रामदास कदमांच्या वक्तव्यावर पलटवार करताना भास्कर जाधव म्हणाले, "मेळाव्यात भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना किंमत नाही. त्यांना नीतेश राणे मार्गदर्शन करतात. स्वतः काही बोलायची हिंमत नाही म्हणून दुसऱ्यांकडून बोलायला लावतात."
याचबरोबर, "नीतेश राणेंचे वडीलच विचारत होते की शिवसेनेने मराठी माणसांसाठी काय केले. मुख्यमंत्रीपद भूषवूनही जे सांगता येत नाहीत, ते आज उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारतात," असा टोला त्यांनी लगावला.
या आरोप-प्रत्यारोपामुळे शिंदे गट व ठाकरे गटातील शिवसेना नेत्यांमध्ये तापलेल्या वातावरणाला आणखी धार आली आहे.
