खेड नगरपरिषदेचे प्रभाग आरक्षण जाहीर – काहींना समाधान, काहींना निराशा
- by Yogesh Bandagale
- October 08, 2025
- 207 views
खेड : खेड नग रपरिषदेतील प्रभाग आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता आणि काहींमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वीच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले होते, ज्यामध्ये महिला नगराध्यक्ष होणार असल्याचे ठरले आहे.
आता प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यामुळे, प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मोर्च्यांची बांधणी सुरु केली आहे. आरक्षणात काही उमेदवारांना संधी मिळाल्यामुळे आनंद आहे, तर काहींच्या अपेक्षांच्या विरोधात असल्यामुळे काही निराशेच्या छटा दिसून येत आहेत.
नगरपरिषदेतील निवडणूक प्रक्रियेत या आरक्षणामुळे राजकीय रंगत आणि आगामी मोर्चेबांधणी अधिकच तीव्र होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
मुख्याधिकारी आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या मते, आरक्षणाची ही जाहीरात इच्छुक नागरिकांना प्रभाग निवडणुकीस तयारीसाठी पुरेसा वेळ देईल.
उमेदवारांच्या युक्त्या आणि मोर्चेबांधणीचे राजकीय खेळ आता नगरपरिषद निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
