लायन्स क्लब चिपळूणतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा सत्कार
- by Yogesh Bandagale
- January 02, 2026
- 108 views
शहर सुशोभीकरणासाठी परस्पर सहकार्याची ग्वाही
चिपळूण : लायन्स क्लब चिपळूणच्या वतीने चिपळूण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहराच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी शहर सुशोभीकरणावर विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच, शहराच्या सौंदर्यीकरणासाठी व सामाजिक उपक्रमांसाठी क्लबच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषतः सुशोभीकरणाच्या कामांमध्ये सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्त्वाचे असून लायन्स क्लबसोबत समन्वयाने काम करण्याची आपली सकारात्मक भूमिका असल्याचे सांगितले.
या सत्कारप्रसंगी लायन्स क्लब चिपळूणचे अध्यक्ष शिरीष मूळे, संस्थापक सदस्य रमेश रेळेकर, नंदकुमार चिटणीस, विभागीय अध्यक्ष दिलीप जैन, किसन चिपळूणकर, राजेंद्र वेस्वीकर, नितीन गांधी, विजय रतवा, अभय काणेकर, जयआण्णा नाईक, विजय ओसावल, मिलिंद मुद्राळे आदी मान्यवर उपस्थित होते.
