रत्नागिरी श्रीराम मंदिरातील सीतामाईच्या गळ्यातील १.५५ लाखांचे दागिने चोरी
- by Yogesh Bandagale
- October 01, 2025
- 89 views
रत्नागिरी : शहरातील श्रीराम मंदिरातून सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हार असा तब्बल १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना सोमवारी (दि. २९ सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
या चोरीची नोंद मंदिर व्यवस्थापनाने पोलिसात केली असून, चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिस तपासात तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती :
सोमवारी सकाळी मंदिर परिसरात फारसे लोक नसल्याचा फायदा घेत, लाल रंगाचा शर्ट आणि काळी फुलपॅन्ट परिधान केलेला, दाढीधारी अनोळखी तरुण मंदिरात शिरला. त्याने थेट गाभाऱ्यात प्रवेश करून सीतामाईच्या गळ्यातील २७.२४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १ ग्रॅम सोन्याचा वापर करून तयार केलेला तीन पदरी हार क्षणात खेचून खिशात टाकला आणि तेथून पसार झाला.
ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.
