रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व वार्डांचे आरक्षणही जाहीर
- by Yogesh Bandagale
- October 08, 2025
- 212 views
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मंत्रालयात दोन दिवसांपूर्वी थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण देण्यात आले आहे.
यासोबतच आज नगर परिषदेचे शहरातील सर्व प्रभागांचे आरक्षणही जाहीर करण्यात आले. एकूण १६ प्रभाग असून, यापैकी एका प्रभागात दोन नगरसेवक निवडणूक लढवतील.
नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेस तयार असल्याचे प्रशासनाचे सूत्रांनी सांगितले. निवडणूक अधिकृत जाहीर होताच उमेदवार नोंदणीसाठी अर्ज करू शकतील.
