'भारतीय वन्यजीव सप्ताह' निमित्त वन्यजीव संवर्धनासाठी २ ते ८ ऑक्टोबर विविध कार्यक्रम
- by Yogesh Bandagale
- October 01, 2025
- 110 views
रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ‘भारतीय वन्यजीव सप्ताह’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी (चिपळूण) वनविभागामार्फत या सप्ताहात विविध प्रबोधनात्मक आणि उपक्रमशील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमांचा लाभ घेऊन वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केले आहे.
वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने १९७२ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळा तर्फे हा उपक्रम राबवला जातो.
सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम :
-
२ ऑक्टोबर : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ‘संगीत बिबट अख्यान’ हा कार्यक्रम.
-
३ ऑक्टोबर : सायंकाळी ७ वा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) कार्यालयाच्या आवारात नव्याने उभारलेल्या फोटो गॅलरी व कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन.
-
४ ते ६ ऑक्टोबर : सह्याद्री संकल्प सोसायटी व चिपळूण वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनजीवन विषयावर आधारित छायाचित्र प्रदर्शन.
-
७ ऑक्टोबर : ग्लोबल टुरिझम चिपळूण आणि चिपळूण वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव विषयावर चर्चासत्र.
-
२ ते ८ ऑक्टोबर : जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनसंवर्धनाशी संबंधित प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन.
वन्यजीवांचे अस्तित्व आणि निसर्गसंतुलनासाठी नागरिकांनी या कार्यक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
