बँक ऑफ इंडियाच्या आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा देवरुखात संपन्न
- by Yogesh Bandagale
- February 14, 2026
- 22 views
देवरुख (प्रतिनिधी : सुरेश सप्रे) – बँक ऑफ इंडियाच्या १४ जिल्ह्यांअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा देवरुख या देवनगरीत उत्साहात पार पडल्या. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महिला व पुरुष खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेचे उद्घाटन संजय कदम (झोनल मॅनेजर, पुणे), नरेंद्र देवरे (झोनल मॅनेजर, रत्नागिरी) व अंजनी आझाद (डेप्युटी झोनल मॅनेजर, रत्नागिरी) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे जनरल सेक्रेटरी शिरीष राणे, अध्यक्ष विनोद कदम, तसेच प्रदीप यादव उपस्थित होते.
बाईक रॅलीतून दिला सामाजिक संदेश
स्पर्धेदरम्यान अधिकारी संघटनेच्या सभासदांनी कोल्हापूर ते देवरुख अशी बाईक रॅली काढत बँकिंग क्षेत्रातील पाच दिवसांचा आठवडा, सरकारी बँकांच्या खाजगीकरणाला विरोध, काम-खाजगी आयुष्य समतोल आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य-तंदुरुस्तीचा संदेश दिला. या रॅलीत शंकर सेन (फिल्ड मुख्य महाप्रबंधक) यांनी स्वतः १०० कि.मी. अंतर बाईकवर प्रवास करून सहभाग नोंदवला. देवरुख येथे त्यांचे स्वागत नरेंद्र देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेतील निकाल
पुरुष सांघिक स्पर्धा
-
प्रथम : रत्नागिरी
-
द्वितीय : सोलापूर
-
तृतीय : सांगली
महिला सांघिक स्पर्धा
-
प्रथम : सोलापूर
-
द्वितीय : रत्नागिरी
-
तृतीय : पुणे
ओपन पुरुष एकेरी
-
प्रथम : सौरभ साहू (सोलापूर)
-
द्वितीय : किरण खोपडे (रत्नागिरी)
-
तृतीय : जबीन जोसेफ (रत्नागिरी), विनोद कुमार मुला (सोलापूर)
ओपन महिला एकेरी
-
प्रथम : सुजल कावळे (सोलापूर)
-
द्वितीय : सिवा प्रिया (रत्नागिरी)
-
तृतीय : मयुरी तावडे (रत्नागिरी), निकिता सोबती (पुणे)
ओपन पुरुष दुहेरी
-
प्रथम : स्मृती रंजन साहू व रामेश्वर भंडारे (पुणे)
-
द्वितीय : किरण खोपडे व ब्रिजन्य शर्मा (रत्नागिरी)
-
तृतीय : जबीन जोसेफ व ऋषिकेश गावडे (रत्नागिरी), उमेश पात्रे व अमित जाधव (सांगली)
ओपन महिला दुहेरी
-
प्रथम : सुजल कावळे व मधुरा देशपांडे (सोलापूर)
-
द्वितीय : सिवा प्रिया व मयुरी तावडे (रत्नागिरी)
-
तृतीय : निकिता सोबती व निशा त्रिभुवन (पुणे), खुशनुमा शेख व राजश्री कुलकर्णी (सांगली)
महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांतील बँक ऑफ इंडियाचे उत्कृष्ट खेळाडू देवरुखसारख्या छोट्या शहरात एकत्र येऊन स्पर्धा रंगवल्याने स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
बक्षीस वितरण समारंभ
बक्षीस वितरण समारंभ नरेंद्र देवरे (झोनल मॅनेजर, रत्नागिरी), अंजनी आझाद, अमोल सांगले (अध्यक्ष, अधिकारी संघटना), प्रमोद शिंदे (जनरल सेक्रेटरी), राहुल भालेराव (उपाध्यक्ष, स्टाफ युनियन पुणे), प्रसाद किरपेकर, शिवाजी शिंदे (सहसेक्रेटरी, स्टाफ युनियन पुणे) व मंगेश प्रभुदेसाई (BAST अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व सूत्रसंचालन विनोद कदम (खजिनदार, आंचालिक क्रीडा समिती रत्नागिरी व अध्यक्ष, स्टाफ युनियन पुणे) यांनी केले. आभार प्रदर्शन निखिल साटम (सहसेक्रेटरी, स्टाफ युनियन पुणे) यांनी केले. या स्पर्धेसाठी बँक ऑफ इंडिया शाखा देवरुखचे कर्मचारीवृंद तसेच तालुका बॅडमिंटन संघटनेचे सहकार्य लाभले.
