प्रभाग क्र.१० (जागा १० अ व १० ब) मधील सदस्यपदांकरिता २० डिसेंबर रोजी मतदान
- by Yogesh Bandagale
- December 03, 2025
- 47 views
रत्नागिरी, दि. ३ (जिमाका) : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात नेमणुका आणि वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्याबाबतचे औपचारिक आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जारी केले आहेत. प्रभाग क्र.१० (जागा १० अ व १० ब) मधील दोन सदस्य पदांसाठी मतदान २० डिसेंबर २०२५ रोजी होणार असून मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळपासून करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेश क्रमांक रानिआ-२०२५/सुनिका/नप/प्र.क्र.१४/का-६ दि. २९ नोव्हेंबर २०२५ तसेच महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ मधील नियम ४ व ५ च्या तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांनी या निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित केले आहे.
निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक
-
प्रभाग क्रमांक १० साठीचे निवडणूक निर्णय अधिकारी — उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी
-
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी —
-
अपर तहसिलदार, शेतजमीन व न्यायाधिकरण, रत्नागिरी
-
निवासी नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, रत्नागिरी
-
महत्वाच्या तारखा
-
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक — १० डिसेंबर २०२५, दुपारी ३ वाजेपर्यंत
नामनिर्देशन मागे घेण्याचे ठिकाण : निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, रत्नागिरी नगरपरिषद कार्यालय -
निवडणूक चिन्हांचे वाटप व अंतिम उमेदवारांची यादी — ११ डिसेंबर २०२५
-
मतदानाचा दिनांक — २० डिसेंबर २०२५
वेळ : सकाळी ७.३० ते सायं. ५.३० -
मतमोजणी व निकाल जाहीर — २१ डिसेंबर २०२५, सकाळी १० पासून
ठिकाण : संत गाडगेबाबा सभागृह, रत्नागिरी नगरपरिषद, रत्नागिरी -
निकाल राजपत्रात प्रसिद्ध — २३ डिसेंबर २०२५ पूर्वी, महाराष्ट्र नगरपालिका कायद्यातील कलम १९ नुसार
रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील या दोन जागांसाठीची निवडणूक स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार असून प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन केले आहे.
