जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त दृष्टिबांधित विद्यार्थी याचा गौरव
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 185 views
देवरूख (प्रतिनिधी) : जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून प्रबोधन प्रसारक शिक्षण संस्था, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, देवरूख येथे इतया थर्ड इयर बी फार्मसी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दृष्टिबांधित विद्यार्थी कु. वाहिब मोअज्जम कडवईकर याचे नॅब चिपळूण च्या वतीने पांढरी काठी प्रधान करण्यात आली.
या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ . अमोल खाडे सर, असोसिएट प्रोफेसर वैष्णवी नलावडे मॅडम तसेच नॅबचे श्री. संदीप नलावडे सर उपस्थित होते.
यावेळी नॅब नाशिक तर्फे देण्यात येणारा “आदर्श विद्यार्थी गौरव पुरस्कार” कु. वाहिब मोअज्जम कडवईकर यांना देऊनही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमातून समाजात दृष्टिबांधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
