नितीन बांडागळे यांना राज्यस्तरीय ‘विश्व समता कलामंच कलाभूषण’ पुरस्कार प्रदान
- by Yogesh Bandagale
- February 16, 2026
- 58 views
लोवले (ता. संगमेश्वर), दि. १६ : विश्व समता कला मंच लोवले यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘विश्व समता कलामंच कलाभूषण पुरस्कार – २०२६’ मुरादपूर–देवरूख येथील नितीन बांडागळे यांना प्रदान करण्यात आला.
सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, जल, पर्यावरण तसेच पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शुभगंधा मंगल कार्यालय, मयुरबाग, लोवले येथे उत्साहात पार पडला.
या प्रसंगी मानपत्र, आकर्षक सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन नितीन बांडागळे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जे. जाधव (M.A., B.Ed., DSM) यांनी केले होते.
हा पुरस्कार धम्मक्रांती कला मंच रत्नागिरीचे कार्याध्यक्ष संतोष जाधव तसेच बांधकाम विभाग, खेड येथील शाखा अभियंता दीपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉक्टर सुनील शंकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास उदय जाधव, युवराज कांबळे, भावना खोब्रागडे, राहुल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनोज जाधव, बबन जाधव, जनार्दन मोहिते, आशुतोष जाधव, समीर जाधव, अनिल जाधव, प्रचित मोहिते, धार्मिक मोहिते तसेच धम्मक्रांती कला मंच रत्नागिरी यांच्या सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
या पुरस्कारप्राप्तीनिमित्त नितीन बांडागळे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
