नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी ‘बेस्ट स्माईल कॉन्टेस्ट’
- by Yogesh Bandagale
- September 22, 2025
- 89 views
चिपळूण : “उत्सव नारीशक्तीचा… सन्मान नारीशक्तीचा…” या घोषणेसह नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. दाभाडे यांच्या ॐकार डेंटल क्लिनिक, चिपळूणतर्फे यावर्षीदेखील खास महिलांसाठी बेस्ट स्माईल कॉन्टेस्ट आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत आकर्षक बक्षिसांसह प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र दिले जाणार असून सहभाग पूर्णपणे मोफत आहे.
स्पर्धेचा कालावधी गुरुवार दि. 22 सप्टेंबर (घटस्थापना) सकाळी 10.00 वा. ते शनिवार दि. 02 ऑक्टोबर (दसरा) रात्री 12.00 वा. पर्यंत असेल. ही स्पर्धा फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांसाठी खुली असून 18 वर्षांवरील सर्व महिला सहभागी होऊ शकतात. सहभागी होण्यासाठी दोन लेटेस्ट फोटो (एक स्माईलचा क्लोजअप व एक पासपोर्ट फोटो), पूर्ण नाव, पत्ता व व्हॉट्सअप क्रमांक या तपशीलांसह 9765845875 या क्रमांकावर मेसेज करणे आवश्यक आहे. ॐकार डेंटल क्लिनिकच्या अधिकृत फेसबुक पेजला फॉलो करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेमध्ये एकच प्रवेश करता येईल. याआधीच्या बेस्ट स्माईल कॉन्टेस्टमधील विजेत्या व उपविजेत्या पुन्हा सहभागी होऊ शकणार नाहीत. परीक्षकांचा निर्णय अंतिम मान्य केला जाईल. निकाल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार असून स्पर्धेसंदर्भात कोणताही बदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील.
डॉ. दाभाडे यांचा ॐकार दातांचा दवाखाना (अॅडव्हान्स्ड इंप्लांट आणि स्माईल डिझाईनिंग सेंटर) यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी 9765845875 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे डॉ. दाभाडे यांनी कळविले आहे.
