धावू प्लास्टिक मुक्तीसाठी! चिपळूण हाफ मॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद
- by Yogesh Bandagale
- November 30, 2025
- 225 views
चिपळूण : चिपळूण संघर्ष क्रीडा मंडळ आयोजित आणि चिपळूणकर यांच्या सहकार्याने होणारी दुसरी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी सकाळी पार पडली. राज्याबाहेरील आणि महाराष्ट्रातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील १८९५ धावपटू यामध्ये सहभागी झाले होते. चिपळूणचे आमदार शेखर निकम, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू अशोक शिंदे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू असलम इनामदार, पंकज मोहिते, प्रो कबड्डी स्टार आदित्य शिंदे, संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम यांच्या उपस्थितीत सकाळी साडेसहा वाजता २१ किलोमीटर स्पर्धेला सुरुवात झाली. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण बाजारपेठ, गोवळकोट काळुस्ते येथून परत येऊन रेल्वे स्टेशनमार्गे धावपटू परत आले. संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तैनात होते; धावपटूंना पाणी पुरवून प्रोत्साहित करत होते.
या स्पर्धेसाठी एअर मार्शल हेमंत भागवत, प्रसाद देवस्थळी (रत्नागिरी) आणि संध्या दाभोळकर यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम पहिले. या वर्षीची स्पर्धा “धावू प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी” या पर्यावरणपूरक थीमवर आधारित होती. थीम पार्टनर म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्था कार्यरत असून ही संस्था १९९२ पासून पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहे. मागील पाच वर्षांत संस्थेने २५० टन प्लास्टिक संकलित करून पुनर्वापरासाठी पाठवले आहे. स्पर्धकांनी बीब घेताना १०० ग्रॅम स्वच्छ प्लास्टिक जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमातून सहभागींच्या लकी ड्रॉमध्ये विजेत्यास स्मार्ट वॉच देण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम, स्पर्धा प्रमुख प्रसाद आलेकर, नयन साडविलकर, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे आणि रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांनी मेहनत घेतली.
या स्पर्धेत पाच किलोमीटर वय वर्ष सोळा वर्षे मुली गटामध्ये हुमेरा सय्यद, अनुष्का खेराडे, देविका बने यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. पाच किलोमीटर १७ वर्षा खालील मुली या गटात सिद्धी चिनकटे, वेदिका बामणे, वेदिका हरवडे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
पाच किलोमीटर १४ वर्षे मुली शाळा गट यामध्ये इच्छा राजभर, श्रेया बने, मृणाली खेराडे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. पंधरा वर्षे मुली शाळा गट यामध्ये निधी शिगवण, संगमी गुडेकर, रिया भानशे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
सोळा वर्षे मुले शाळा गट यामध्ये साईप्रसाद वराडकर, अथर्व दवंडे, तन्वेज पालशेतकर यांनी प्रथम तीन क्रमांक, १७ वर्षे मुले शाळा गट पृथ्वी राजभर, आयुष बर्गे, मनीष पालगे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. १४ वर्ष मुले आर्यन सुर्वे, मंथन दुदे, वेदांत खेराडे, सुरज तांबे, रवी कश्यप, आर्यन मेस्त्री यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. साठ वर्षावरील पुरुष गटात निहुतराम विश्वकर्मा, संजय शिंदे, लक्ष्मण कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. १४ ते ५० वयोगटात दीपक वरफे, महेश पवार, मयुरेश बेंडल, १४ ते ६० वर्षे वयोगटात भारत घोले, डॉ. सुनील निकम, ज्ञानेश्वर पवार यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. पुरुष खुल्या गटात स्वराज्य जोशी, संदीप जोशी, यश शिर्के, ३१ ते ४० पुरुष गटात गणेश राजवीर, चेतन नानिजकर, उमेश खेडेकर, ५१ ते ६० महिला वयोगटात सुशीला विखारे, ज्योती दाढा, सरिता कर्वे, साठ वर्षावरील महिला गटात शालन रानडे, प्राची जोशी, अस्मिता वानकर, ४१ ते ५० महिला वयोगटात शगुप्ता पागरकर, वर्षा खानविलकर, मनीषा वाघमारे, महिला खुल्या गटात ऐश्वर्या लोंढे, कोमल मोहिते, श्रावणी पवार, ३१ ते ४० महिला गटात मनस्वी गुडेकर, स्नेहा साडवीलकर, अदिती शिंदे, ४१ ते ५० महिला वयोगटात अलमास मुलानी, मृदुला परकार, माधुरी शिवदे, ५१ ते ६० महिला वयोगटात साधना धनवडे, श्रद्धा तानवीडकर, वैशाली म्हात्रे, साठ वर्षावरील पुरुष गटात संजय पाटील,अजित कंभोज, राजेंद्र महाजन, ४१ ते ५० वयोगट पुरुष जयंत शिवदे, अनंत तनकर, शुभांदु बुरटे, ५१ ते ६० पुरुष वयोगटात रणजीत कानबरकर, विठ्ठल रघाडे, भरत लोखंडे, दहा किलोमीटर पुरुष खुल्या गटात सुरज रामचंद्र झोरे, ओंकार बैकर, गणेश काले, दहा किलोमीटर ३१ ते ४० पुरुष गटात अनिल कोरवी, देशराज मिना, धोंडीबा गिरतवाड यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. २१ किलोमीटर ५१ ते ६० वयोगटात महिला गटात रत्नप्रभा पिसाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
२१ किलोमीटर ४१ ते ५० महिला वयोगटात कामिनी पटेल, मानसी सचिन मराठे, विभावरी सप्रे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. २१ किलोमीटर महिला खुल्या गटात साक्षी जड्याळ, अमरिता पटेल, श्रेया पाटील, किरण साहू, सुरभी सावर्डेकर, अंजली सोमण, २१ किलोमीटर ६० वर्षावरील पुरुष गटात मृणाल विश्वास, उदय महाजन, अलेक्स कोयलो, ४१ ते ५० पुरुष वयोगटात सुनील शिवने, पवन प्रजापती, अमित विचारे, ५१ ते ६० वयोगटात जगदाळे प्रभाकर, अनिल टोकरे, जॉर्ज थॉमस, २१ किलोमीटर पुरुष वयोगटात राज तिवारी, दिनेश, हरीश शेवरण, २१ किलोमीटर ३० ते ४० वयोगट पुरुषमध्ये समीर माळी, योगेश सानप, सुशीलकुमार भारतीय यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
यामध्ये छत्तीसगड, कर्नाटक, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली आणि पंजाब या राज्यांतील ३० धावपटू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सातारा, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली, अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि नंदुरबार या जिल्ह्यांतून ३९० धावपटू, तर रत्नागिरी जिल्ह्यातील १५८४ धावपटू या स्पर्धेत भाग घेतला. २१ आणि १० किमी शर्यतींसाठी सुमारे ५०० स्पर्धक, तर शालेय ५ किमी गटासाठी सुमारे १२०० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्थानिकांना प्रोत्साहन म्हणून ५ किमीचा स्वतंत्र गट केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी राखीव ठेवण्यात आले होता. चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे हेही जनगागृतीसाठी धावले. त्यांच्यासोबत अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही सहभाग घेतला.
