जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; १०५ गावांची अधिकृत यादी जाहीर

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर वाढत असल्याचे स्पष्ट झाले असून, वन विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून खात्री केल्यानंतर बिबट्यांचा वावर असलेल्या गावांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या या यादीत तब्बल १०५ गावांचा समावेश असून, त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील गावांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह रत्नागिरी शहरातही बिबट्याची दहशत पसरली आहे.

रत्नागिरी वनपरिक्षेत्रामध्ये रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो. या सर्व तालुक्यांमध्ये सध्या बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. परिक्षेत्रात साधारणपणे शंभर ते सव्वाशे बिबटे असण्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटे थेट मानवी वस्त्यांमध्ये शिरत असून, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कुत्रे, पाळीव जनावरे यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत असून, काही ठिकाणी माणसांवरही हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार राजापूर तालुक्यात पेंडखळे, सागवे, केरवण, भू, भानवली, नाटे, तुळसवडे, शिवणे, वडदहसोळ, कोंड्ये, ओणी, वाटूळ, आडिवरे, ताम्हाणे या गावांचा समावेश आहे.

रत्नागिरी तालुक्यात जाकादेवी परिसर, जयगड, सांडेलवण, कोतवडे, करबुडे, हातखंबा, फणसवळे, निवळी, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, नेवरे, जाकादेवी, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, उंडी, वरवडे, मालगुंड, भंडारपुळे, जांभरुण, भोके खानू, पाली, नाणीज, उंबरे, पावस, हरचेरी, टिके, टेंभ्ये, नाचणे, जुवे, कर्ला, फणसोप, कोळंबे, गोळप, गावखडी, मेर्वी, पूर्णगड, गावडेआंबेरे, दाभिल, आंजणारी, मावळंगे, हातिस, चिंचखरी, सोमेश्वर, वळके, केळवणे, चरवेली, कुवारबाव, मिरजोळे, शिरगाव, आडी, साखरतर, कासारवेली या गावांचा समावेश आहे.

लांजा तालुक्यात भडे, वनगुळे, गवाणे, हर्चे, पुनस, लांजा, धुंदरे, मठ, गोळवल, वडगाव, प्रभानवल्ली, विलवडे, हसोळ, आडवली, शिपोशी, वेरवली, खेरवसे, कोर्ले, शिरवली या गावांमध्ये बिबट्यांचा वावर नोंदविण्यात आला आहे.

संगमेश्वर तालुक्यात फुणगूस, कोसुंब, शिवणे, कुरधुंडा, सायले, तर आरवली परिसरात कुंभारखाणी, राजिवली, राजवाडी, कडवई, धामणी, काजरी, साखरपा परिसरातील गावांचा समावेश या यादीत आहे.

बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे, रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडू नये तसेच पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित लेख