चिपळूण पालिकेवर भगवा फडकविण्यात सदानंद चव्हाण यांचे नेतृत्व महत्त्वाचे
- by Yogesh Bandagale
- December 30, 2025
- 189 views
चिपळूण : प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या समर्थ व कल्पक नेतृत्वाखाली चिपळूण नगरपरिषदेवर शिवसेना–भाजप युतीचा भगवा दिमाखात फडकविल्याबद्दल पेढे मोरेवाडी ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे खास अभिनंदन केले.
नगरपरिषद निवडणुकीच्या काळात २००४–०५ साली पाहिलेला उत्साह व ऊर्जा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. राजकारणात कितीही बदल झाले तरी “साहेब, आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत,” असे अभिवचन पेढे मोरेवाडी ग्रामस्थांनी यावेळी दिले.
नगरपरिषद निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग देता आला नसला, तरी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली. आपण द्याल ती जबाबदारी पूर्ण करून पंचायत समितीवरही भगवा फडकविण्यासाठी मेहनत करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील राजकारणात आपल्यासारखे नेतृत्व नसून, आपल्या नेतृत्वाखालीच आमची भविष्यातील राजकीय वाटचाल राहील, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ लक्ष्मण मोरे, सुरेश पवार, माजी सरपंच दीपक मोरे, माजी पंचायत समिती सदस्या सौ. ऋतुजा पवार, जनार्दन मोहिते, संतोष कदम, नामदेव मोरे, भालचंद्र धाडवे, रवींद्र धाडवे, मोहन लोटेकर, श्रीपत आदावडे, शंकर आदावडे, पुंडलिक मोरे, अमोल मोरे, दत्ताराम जाडे, कृष्णा आदावडे, रुपेश पवार, संदेश मोरे, भास्कर आदावडे आदी उपस्थित होते.
