चिपळुणातील रसिक चायनीजचे संजय सावर्डेकर यांचे निधन
- by Yogesh Bandagale
- February 27, 2026
- 3173 views
चिपळूण: मार्कंडी येथील रहिवासी व ‘रसिक चायनीज’चे मालक श्री. संजय नारायण सावर्डेकर (वय ५६) यांचे आज शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ८.४५ वाजता मुंबई येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान आकस्मिक दुःखद निधन झाले.
तरुणपणी त्यांनी ‘रसिक चायनीज’ या नावाने नावीन्यपूर्ण व्यवसायाची सुरुवात केली. गेली सुमारे ३० वर्षे त्यांनी अथक परिश्रम घेत आपल्या व्यवसायाला नावारूपास आणले. दर्जेदार व उत्कृष्ट पदार्थ, स्वच्छता आणि ग्राहकांच्या आवडीनुसार सेवा या तत्त्वांमुळे त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना परिसरात विशेष लौकिक प्राप्त झाला होता.
त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ते परांजपे हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. राजेश सावर्डेकर, डेप्युटी इंजिनिअर श्री. संतोष सावर्डेकर आणि सौ. सायली सूर्यकांत चिपळूणकर यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ठीक ७.०० वाजता मार्कंडी येथील निवासस्थानापासून निघून रामतीर्थ स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
