इंग्लिश मिडीयम स्कूल पाग, विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या  इंग्लिश मिडियम स्कूल पाग विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन  नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले .

यावेळी     कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. अनिरुद्ध निकम सर अध्यक्ष, सह्याद्री  क्रीडा प्रबोधिनी, सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, सीमाताई चाळके माजी नगरसेविका, मैथिली नरळकर समाजसेविका, राजन चिले समाजसेवक, पटेल मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी, अरविंद शेलार समाजसेवक, शैलेश सुर्वे.न्यू इंग्लिश स्कूल पाग मुख्याध्यापक, अनिल कडव महिला विद्यालय पाग मुख्याध्यापक, पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, सर्व पालक ग्रामस्थ नागरिक  उपस्थित होते. यावेळी शाळेतील मुलींनी पाहुण्यांचे औक्षण केले व शब्दसुमनानी स्वागत केले.

यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक महेंद्र सोळुंके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला याबद्दल माहिती दिली.  यानंतर शाळेच्या दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन सर्व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना या नृत्याने करण्यात आली. यानंतर जुनियर सीनियर च्या मुलांनी ही छान नृत्य  केले. या कार्यक्रमात भरतनाट्यम, कथ्थक,समाज प्रबोधन पर नाटक,कोकण नृत्य, कोळी नृत्य, मंगळागौर, फनी डान्स अशा प्रकारचे नृत्यप्रकार विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10 वी मधील जागृती मोहिते आणि इयत्ता 7 वी मधील विदिशा मोहिते व शिक्षिका सौ. क्रांती कदम यांनी केले. हा सांस्कृतिक कार्यक्रम खूप छान पार पडला परिसरातील पालक व नागरिकांची खूप गर्दी झाली होती. त्यांनी टाळ्या वाजून मुलांना प्रोत्साहित केले.


 संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक सौ. दिशा दिवाडकर .सौ. पूजा कदम . सौ.वनिता पवार.सौ. प्रियंका कोकरे. सौ. प्रज्ञा कुलकर्णी.  श्रीम. पुनम अग्रे. सौ. कविता कदम. सौ. क्रांती कदम.श्रीम. सेजल कदम . सौ.ओमेश्री सोनवणे, शिक्षकेतर कर्मचारी सौ दुंडकर आणि सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख