आयुर्वेदिक आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 43 views
चिपळूण : आयुर्वेदिक आधार चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे कुंभार्ली धनगरवाडी मुरली येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. वर्षा कुडचडकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुडचडकर, बालरोग तज्ञ डॉ. अंकिता सुर्वे, पॅथॉलॉजीस्ट आदिती सुवार, तसेच नुपूर देवरुखकर व दिपक हुंडरे उपस्थित होते. शिबिरात लहान मुलांची तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर, रक्त गट यासह विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या.
याशिवाय, डायबेटिस, रक्तदाब, संधीवात, मणक्याचे विकार आणि इतर अनेक आजारांवर सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात उपस्थितांना आवश्यक त्या मोफत औषधांचे वाटप देखील करण्यात आले.
स्थानिक ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेत आरोग्याबाबत मार्गदर्शन मिळवले. या उपक्रमासाठी सौ. सुनिता गोरे यांनी बहुमोल सहकार्य केले.
आयुर्वेदिक आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मोफत मिळण्याची संधी मिळाली असून, अशा कार्यक्रमांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.
