आकले-चोरगेवाडीत कबड्डी स्पर्धेला विनेश मोहिते यांची भेट
- by Yogesh Bandagale
- March 17, 2026
- 103 views
चिपळूण, प्रतिनिधी : चिपळूण तालुक्यातील आकले-चोरगेवाडी येथे श्री. केदारेश्वर छबिना उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य 60 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेला समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांनी भेट देत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
रविवार, दि. 15 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे यंदाचे 12 वे पर्व असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाच्या वतीने विनेश मोहिते यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना मोहिते यांनी ग्रामस्थांचे आणि आयोजकांचे कौतुक केले. “ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवणे ही अभिमानास्पद बाब आहे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी सर्व खेळाडू, मान्यवर आणि प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेदरम्यान सह्याद्री नांदिवसे आणि आकले यांच्यातील सामना रंगला होता. मुंबई, ठाणे आणि पुणे येथील तरुणांनीही या आयोजनात सहभाग घेत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सुभाष तावडे (माजी सैनिक), संजय कदम, प्रकाश तावडे, अक्षय कदम, अशोक मालुसरे, संतोष सावंत, भरत मोरे, मुकुंद कदम, शैलेश कदम, रोशन मोरे, अमित कदम, सूरज कदम, राहुल कदम, श्रीकांत कदम आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कदम यांनी केले.
