अपरान्त हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूजा भुरण रुजू

चिपळूण : शहरातील महिलांना दर्जेदार व सातत्यपूर्ण स्त्रीरोग व प्रसूती सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने अपरान्त हॉस्पिटल येथे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूजा ओंकार भुरण (B.A.M.S., D.G.O.) पूर्णवेळ सेवेत रुजू झाल्या आहेत.

डॉ. भुरण या अनुभवी तज्ज्ञ असून गर्भधारणा, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व उपचार तसेच विविध स्त्रीरोगांवरील उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. रुग्णांशी सौहार्दपूर्ण संवाद, अचूक निदान आणि परिणामकारक उपचार यासाठी त्यांची ओळख आहे.

त्यांच्या सेवेमुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना वेळेवर तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. विशेषतः गर्भारपणातील नियमित तपासणी, जोखमीच्या गर्भधारणांची निगा आणि प्रसूतीनंतर आई व बाळाच्या आरोग्याची काळजी यावर त्यांचा विशेष भर राहणार आहे.

दरम्यान, अपरान्त हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा अनुभवी चमू कार्यरत आहे. यात केईएम प्रशिक्षित ज्येष्ठ सर्जन डॉ. सदगुरु पाटणकर, हृदयविकार व मधुमेह तज्ज्ञ डॉ. अतुल बोरोडे, फिजिशियन डॉ. ओंकार खोत, महिला सर्जन डॉ. भक्ती पालांडे, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. श्रीश भास्करवार, श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. सौरभ सुर्वे, रेडिओलॉजिस्ट डॉ. सचिन विधाते आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुरज शिकलगार यांचा समावेश आहे.

मुंबई, पुणे, मिरज यांसारख्या शहरांमध्ये मिळणाऱ्या आधुनिक आरोग्य सुविधा चिपळूणमध्येच उपलब्ध करून देण्याचा हॉस्पिटलचा उद्देश आहे. तसेच रुग्णांसाठी २४x७ आपत्कालीन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

रुग्णांनी अपॉइंटमेंटसाठी 7998898989 / 7998737373 किंवा (02355) 254254 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.

डॉ. पूजा भुरण यांच्या पूर्णवेळ नियुक्तीमुळे अपरान्त हॉस्पिटलच्या तज्ज्ञ आरोग्यसेवेच्या परंपरेत मोलाची भर पडणार आहे.

संबंधित लेख