'धर्मवीर 3' ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल: एकनाथ शिंदे

नागपूर : धर्मवीर 2 चित्रपटानंतर (Dharmaveer 2) सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. आनंद दिघेंचं (Anand Dighe) काम हे एवढं मोठं आहे की ते एक-दोन सिनेमात सामावू शकत नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. धर्मवीर 3 हा चित्रपट आलाच तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं.

स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर आतापर्यंत धर्मवीर आणि धर्मवीर 2 असे चित्रपट आले आहेत. धर्मवीर 2 मध्ये आनंद दिघे यांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं. दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचं दाखवण्यात आलं. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं. आनंद दिघे यांच्या मृत्यूवर शंकाही उपस्थित केली जाऊ लागली. त्यामुळे शिंदेंनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे.

धर्मवीर 3 चित्रपट येणार का आणि आला तर त्याची स्क्रिप्ट कोण लिहिणार असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की," आनंद दिघे यांचं काम काही एक दोन चित्रपटातून मांडता येणार नाही, त्यांचं काम मोठं आहे. पण धर्मवीर 3 चित्रपट आला तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल. कारण त्यानंतर पुढे काय झालं हे मलाच माहिती आहे."

 

संबंधित लेख