गौतमी पाटीलवर मरगळे कुटुंबीयांचा गंभीर आरोप, कारने धडक दिल्यानंतर चौकशी तर सोडाच पण एक मेसेजही नाही

पुणे : सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने धडक दिल्यामुळे रिक्षाचालक व दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी वडगाव पुलाजवळ घडली. या अपघातानंतर रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी अवस्थेत दीनानाथ रुग्णालयात उपचार घेत आहेत.

अपघात एवढा गंभीर असतानाही गौतमी पाटीलच्या टीमकडून चौकशी केली नाही, किंवा एक साधा मेसेजसुद्धा आला नाही, असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. त्याचबरोबर पोलिसांकडूनही योग्य सहकार्य होत नसल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

अपघाताविषयी मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळील एका हॉटेलसमोर रिक्षा उभी असताना मागून आलेल्या भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले, तसेच रिक्षाचालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही कार नृत्यांगना गौतमी पाटीलची असल्याचे समोर आले. मात्र अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

 

संबंधित लेख