‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 189 views
मुंबई : महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. या संदर्भात विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना तातडीने ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे.
मंत्री तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर (Twitter) या प्रक्रियेची सविस्तर माहितीही शेअर केली. त्यांनी सांगितले की, “ई-केवायसी प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची असून यामुळे सन्मान निधी वितरण अधिक सुलभ आणि सुसूत्र होईल.”
? ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी?
-
https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
-
मुखपृष्ठावरील e-KYC बॅनरवर क्लिक करावे.
-
आधार क्रमांक आणि Captcha टाकून Send OTP करावे.
-
मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit करावा.
-
प्रणाली तपासेल की e-KYC आधी पूर्ण झाली आहे की नाही.
-
जर पूर्ण असेल तर तसा संदेश येईल.
-
नसल्यास पुढील टप्प्यात प्रवेश मिळेल.
-
-
पुढे लाभार्थ्याने पती/वडिलांचा आधार क्रमांक टाकून OTP प्रक्रिया पूर्ण करावी.
-
त्यानंतर जात प्रवर्ग निवडून आवश्यक घोषणा (Declaration) द्यावी.
-
कुटुंबातील कोणीही शासकीय कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याची खात्री.
-
कुटुंबातील केवळ १ विवाहित व १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असल्याची नोंद.
-
-
शेवटी “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
