सावर्डे येथे उद्या अजित पवारांची शोकसभा
- by Yogesh Bandagale
- January 29, 2026
- 164 views
चिपळूण : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय, धडाडीचे व जनतेच्या मनात विशेष स्थान असलेले उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या संदर्भात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सावर्डे (ता. चिपळूण) येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
२८ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने ही शोकसभा घेण्यात येणार असून, त्यांचे नेतृत्व, विकासाभिमुख कार्य, दूरदृष्टी आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली निष्ठा यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान व जनतेचा खंबीर आधार असलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सदर शोकसभा शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता आमदार श्री. शेखर गोविंदराव निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात, सावर्डे येथे आयोजित करण्यात आली असून, मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक तसेच सह्याद्री परिवारातील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
