राजापूर उपनगराध्यक्षपदी विनय गुरव यांची बिनविरोध
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 120 views
राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे नगरसेवक विनय गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी महायुतीकडून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
दरम्यान, नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार महेश शिवलकर यांची, तर महायुतीच्या वतीने माजी नगरसेवक सुभाष शाम बाकाळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
या निवडीमुळे राजापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीचे राजकीय बळ अधिक मजबूत झाले असून, आगामी काळात शहर विकासाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विनय गुरव यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
