मंदार कदम याच्यावर कठोर कारवाई करावी!

चिपळूण प्रतिनिधी : चिपळूण ही सांस्कृतिक विचारांची भूमी असून अशा ठिकाणी विकृत मानसिकतेच्या नराधम व्यक्तींकडून घडणाऱ्या कृत्यांना थारा देता कामा नये, अशी ठाम भूमिका घेत आज चिपळूणमधील सुज्ञ व जागृत नागरिकांनी चिपळूण पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान मंदार कदम या व्यक्तीने केलेल्या कथित विकृत कृत्याच्या तीव्र निषेधार्थ त्याच्यावर कठोरात कठोर कायद्यांतर्गत निपक्षपाती कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर प्रकार चिपळूणच्या सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांशी विसंगत असून भविष्यात असे गुन्हे पुन्हा घडू नयेत, यासाठी आरोपीस कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदन सादरीकरणावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तसेच इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्यायाविरोधात आवाज उठवत चिपळूण पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सर्व उपस्थितांनी एकमुखाने केली.

चिपळूणची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आणि समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

 

संबंधित लेख