मंगेश बांडागळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील हातीव पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीने मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश रमेश बांडागळे यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मंगेश बांडागळे हे मुरादपूरचे माजी सरपंच असून आमदार शेखर निकम यांचे ते अत्यंत निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जातात. आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून त्यांनी मतदार संघात विविध विकासकामे प्रभावीपणे राबवली असून त्याचा थेट लाभ स्थानिक जनतेला झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीतर्फे मंगेश बांडागळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांच्या समवेत साडवली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. रूपाली कदम, साडवली पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. तृप्ती मांगले, भाजपचे तालुकाध्यक्ष रुपेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पोमेंडकर, रामचंद्र पंदेरे, समीर बांडागळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून हाती पंचायत समिती गणात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

संबंधित लेख