चिपळूणमध्ये २२ मार्चला मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर
- by Yogesh Bandagale
- March 17, 2026
- 23 views
चिपळूण, प्रतिनिधी : नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने माधवबाग क्लिनिक तर्फे मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. २२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये हृदयविकार, मधुमेह, स्थूलत्व तसेच आहार मार्गदर्शनाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर सल्ला दिला जाणार आहे. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवून हृदयविकाराचा धोका कसा कमी करता येईल, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबिरात ईसीजी (हृदय तपासणी), रक्तदाब (बीपी), रँडम ब्लड शुगर, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण (SPO2) तसेच बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजणी अशा विविध तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘रिस्क असेसमेंट’द्वारे हृदयविकाराचा संभाव्य धोका तपासला जाणार आहे.
तज्ज्ञांकडून मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांसारख्या आजारांवर मार्गदर्शन केले जाईल. तसेच योग्य आहार पद्धती, वजन नियंत्रण आणि ताण-तणाव व्यवस्थापनाबाबतही सल्ला दिला जाणार आहे.
हे शिबिर विशेषतः ३० वर्षांवरील व्यक्ती तसेच छातीत दुखणे, धाप लागणे, थकवा, सूज किंवा अशक्तपणा जाणवणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
हे शिबिर चिपळूण येथील माधवबाग क्लिनिक, C/O स्प्रिंग क्लिनिक, जेड गार्डन, खेंड येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8177982990, 9922486260 किंवा 02355-261007 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
