चिपळूण नगर परिषद निवडणूक; अंदाजे ६४.१५ टक्के मतदान
- by Yogesh Bandagale
- December 02, 2025
- 510 views
चिपळूण : चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा मतदानाचा उत्साह काहीसा कमी झाल्याचे दृश्य दिसून आले. अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिपळूण नगर परिषदेसाठी अंदाजे ६४.१५ टक्के मतदान झाल्याचे समजते.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंगणात होते. तसेच नगरपरिषदेच्या १४ प्रभागांतील २८ नगरसेवक पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. दिवसभर मतदान शांततेत झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
आता सर्वांचे लक्ष मतमोजणीवर केंद्रीत झाले असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
