गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण
- by Yogesh Bandagale
- January 10, 2026
- 90 views
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूल येथे दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव, टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी सभागृह विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी गजबजून गेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीत शिक्षण घेणाऱ्या नागालँडच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने संपूर्ण सभागृह भक्तिरसाने भारावून गेले आणि कार्यक्रमास मंगल वातावरण लाभले.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निखिल नागनाथ माळी
(शिक्षण – बी.ए.एम.एस., एम.एस., नेत्रतज्ज्ञ – Ophthalmologist) उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष शोभा प्राप्त झाली.
कार्यक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष व गद्रे प्रशालेचे शाळा समितीचे चेअरमन श्री. विजयकुमार ओसवाल, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. सविता कर्वे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सौ. शैलजा देवरुखकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. साक्षी गोरीवले, पूर्वप्राथमिक विभाग प्रमुख सौ. प्रिया पोटसुरे, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर शैक्षणिक, क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, पदके व सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आणि पालकांचा अभिमान या क्षणांना विशेष भावनिक रंग देत होता.
विद्यार्थ्यांच्या सांघिक खेळांच्या स्पर्धांची यादी माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. जान्हवी लाड यांनी, तर वैयक्तिक खेळांची यादी उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक श्री. गजानन बर्वे यांनी वाचून दाखवली.
यावर्षी ‘सूर्या हाऊस’ ला बेस्ट हाऊस म्हणून घोषित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल सूर्या हाऊसला मानचिन्ह व ढाल प्रदान करण्यात आली. या सन्मानावेळी सभागृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
इयत्ता दहावीमधून बेस्ट स्टुडंट म्हणून
? मुलींच्या गटातून : कुमारी तन्वी विवेक म्हस्कर
? मुलांच्या गटातून : कुमार अर्णव सुबोध कपडेकर
यांची निवड करण्यात आली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
प्रमुख पाहुणे डॉ. निखिल नागनाथ माळी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत आरोग्य, खेळ, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. सविता कर्वे आणि स्पर्धा विभाग प्रमुख सौ. साक्षी विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री. तुषार जाधव यांनी अत्यंत प्रभावी व नेटकेपणे केले.
प्रशालेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी, पालकवर्ग व विद्यार्थी यांच्या सामूहिक सहकार्यामुळे हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध मांडणी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.
