SCERT शिक्षक स्पर्धेत खेर्डी–चिंचघरी सती विद्यालयाच्या ९ शिक्षकांचे उज्ज्वल यश
- by Yogesh Bandagale
- January 13, 2026
- 95 views
चिंचघरी (खेर्डी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (SCERT), पुणे यांच्या वतीने आयोजित विविध शिक्षक स्पर्धांमध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी–चिंचघरी (सती विद्यालय) येथील एकूण ९ शिक्षकांनी सहभाग घेत उल्लेखनीय व प्रेरणादायी यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे विभागीय पातळीवर विद्यालयाचा शैक्षणिक ठसा अधिक ठळकपणे उमटला आहे.
विविध विभागीय स्पर्धांमध्ये पुस्तक परीक्षण – श्री. जयंत पवार, पोस्टर मेकिंग – श्री. तुकाराम पाटील, गणित–विज्ञान जादूगार – श्री. आनंद भुवड, वादविवाद – श्री. राजेंद्र पवार, विविध क्लब सादरीकरण – सौ. राजश्री सावंत, लोकनृत्य – सौ. गार्गी मेस्त्री, हॅकेथॉन – श्री. शिवाजी पाटील, मानसिक क्षमता – सौ. रुपाली भुवड तसेच एम.एस. वर्ड व एक्सेल – श्री. अनंत डिके यांनी सहभाग घेत आपले शैक्षणिक कौशल्य, नवोपक्रमशीलता व अध्यापनातील सर्जनशीलता सिद्ध केली.
या स्पर्धांमध्ये शिक्षकांनी नवीन शैक्षणिक प्रयोग, डिजिटल अध्यापन साहित्य, नाविन्यपूर्ण उपक्रम, कृतीआधारित शिक्षण व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांसारख्या विषयांवर सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणास परीक्षकांकडून विशेष प्रशंसा मिळाली. विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती, राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत उपक्रम तसेच गुणवत्तावाढीचे अभिनव प्रयोग प्रभावीपणे मांडल्याने विभागीय स्तरावर सती विद्यालयाचे प्रतिनिधित्व यशस्वी ठरले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखरजी निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर, सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे चेअरमन अनिरुद्ध निकम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापिका सौ. सुलोचना जगताप तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
SCERTच्या या स्पर्धा शिक्षकांमधील गुणवत्ता, सर्जनशीलता व व्यावसायिक विकासाला चालना देणाऱ्या ठरत असून खेर्डी–चिंचघरी सती विद्यालयातील शिक्षकांची कामगिरी निश्चितच आदर्श ठरणारी असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
